Sharad Pawar: नागालँडमध्ये शरद पवारांचा पराभव, अजितदादांचा विजय, नेमकं प्रकरणं काय?

Sharad Pawar’s defeat in Nagaland : नागालँडमध्ये शरद पवार (Sharad Pawar)गटाला एक मोठा धक्का बसला आहे. परंतु सर्वात मोठी बाब म्हणजे नागालँडमध्ये अजित पवार गटाचा विजय झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता नागालँड मध्ये देखील अजित पवारांचे वर्चस्व आता पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी ताकद कमी होण्याची शक्यता आहे.(Sharad Pawar: Sharad Pawar’s defeat, Ajitdad’s victory in Nagaland, what are the real issues?)

नेमकं प्रकरणं काय आहे?

राष्ट्रवादीच्या फुटी नंतर राष्ट्रवादीचे दोन गट तयार झाले आहेत. त्यांनतर निवडणूक आयोगाने देखील राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिले आहे. याच दरम्यान, नागालँड विधानसभेचे अध्यक्ष शेरिंगेन लोंगकुमे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांविरो धात दाखल केलेली अपात्रतेची याचिका फेटाळून लावली आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील NCPचे राष्ट्रीय महासचिन हेमंत टकले यांनी ३० ऑगस्ट २०२३ रोजी अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या सात आमदार – पिक्टो शोहे, पी. लॉन्गॉन, नम्री नचांग, ​​वाय. म्होनबेमो हमत्सो, तोइहो येप्थो, वाय मानखाओ कोन्याक आणि ए पोंगशी फोम यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. अखेर नागालँडच्या विधासभा अध्यक्षांनी ही याचिका फेटाळली आहे.

यामध्ये निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोपवत नेते म्हणून मान्यता दिली, त्या निर्णयाच्या आधारे नागालँड विधानसभेचे अध्यक्ष शेरिंगेन लोंगकुमे यांनी अजित पवार गटाच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यामुळे आता हा निर्णय शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा धक्का मानला जात आहे.

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *