Shivajanmatsava celebration: ‘दिवान-ए-आम’मध्ये शिवजन्मोत्सव होणार जल्लोषात साजरा; मुख्यमंत्री ही राहणार हजर

Shivjanmatsava celebration Agra: अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा आज देशभरात जल्लोशात साजरा होत आहे. अनेक ठिकाणे महाराजांच्या जयंतीची जय्य्त तयारी करण्यात आली आहे. अशीच तय्यारी आग्र्यातील ‘दिवान-ए-आम’ मध्ये संपन्न झाली आहे. आज मोठ्या जल्लोशात ‘दिवान-ए-आम’मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करून शिवरायांच्या महान इतिहासाला उजाळा दिला जाणार आहे.(Shivajanmatsava celebration: Shivajanmatsava celebrated in ‘Diwan-e-Aam’; Chief Minister will be present)

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘दिवान-ए-आम’मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामध्ये साजरा केला जाणार आहे. सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून शेकडो शिवभक्त आग्र्यात दाखल झाले आहेत. डिजिटल माध्यमांतून कोट्यवधी शिवभक्त सहभागी होणार आहेत.

हिंदू साम्राज्याच्या दृष्टीने लाल किल्ल्याचे मोठे महत्त्व आहे. येथेच छत्रपती शिवाजी महाराज लाल किल्ल्यातून मुगल सम्राट औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन सुखरूप परतले होते. एवढंच नाहीतर अनेक वर्षे हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. या किल्ल्यामध्ये जयंती साजरा करण्यासाठी प्रथम पुरातत्व विभागाने परवानगी नाकारली होती. परंतु उच्च न्यायालयाने परवनगी दिली. त्यांनतर येथे जोरदार तयारीला सुरवात झाली.

याचबरोबर, लाल किल्ल्यातील शिवजयंती सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून, सोमवारी होणाऱ्या सोहळ्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. लाल किल्ल्यातील ‘दिवान-ए-आम’मध्ये भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या ठिकाणी संगीत सोहळा, शिवजन्म पाळणा, लेझर शोच्या माध्यमातून आग्र्याच्या सुटकेचा इतिहास, पारंपरिक कला प्रदर्शन, शिवजयंती सोहळा तसेच इतर भव्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर पार पडणार आहेत.

दरम्यान, हा सोहळा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पहायला मिळणार आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्याने आग्रावासीयांचे लक्ष वेधले आहे. लाल किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर भगवे ध्वज, होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. Shivajanmatsava celebration

ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *