Pune Drug Racket: दौंड मधील कुरकुंभ MIDC मध्ये सापडले मोठ्या प्रमाणात ड्रग्स

Pune Drug Racket: दौंड तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दौंड तालुक्यातील कुरकुंभ MIDC मध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडले आहेत. त्यामुळे परिसरामध्ये मोठ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. आज पुणे पोलिसांनी पुणे शहर तसेंच जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यात दौंड मधील कुरकुंभ MIDC चा देखील समावेश आहे.(Pune Drug Racket: Large quantity of drugs found at Kurkumbh MIDC in Daund)

मीडिया रिपोर्टनुसार, दौंडच्या कुरकुंभ MIDC मधील अर्थकेंम लॅब्रॉटरी नावांच्या कंपनीवर आज पुणे पोलिसांनी छापा मारला आहे. या छाप्यामध्ये पोलिसांना वेफेड्रीन नावाच्या ड्रग्जचा मोठा साठा सापडला आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. परंतू या घटनेमुळे कुरकुंभ MIDC परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, एवढंच नाही तर, १९ फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी पुणे शहरातून ५२ किलो पेक्षा अधिक ड्रग्स जप्त केली आहेत. या ड्रग्सची किंमत तब्ब्ल १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. या प्रकारा मध्ये पुणे पोलिसांनी वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख या तिघांना अटक केली होती. त्यांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झाले आहे. यामधील वैभन माने आणि हैदर शेख यांच्यावर अनेक गुन्हा दाखल आहेत.

महत्वाच्या बातम्या :-

पोलिसांना संशय येऊ नये म्हणून हे लोक मिठाच्या पॉकेट मध्ये ड्रग्स विकत होते. हैदर शेख याने मिठाच्या पाकिटात विश्रांतवाडी परिसरात ड्रग्स लपावले होते. याची विक्री अनेक ठकाणी केली जायची. हे दोन्ही परदेशी नागरिक आहेत. पुण्यात पकडलेले एमडी ड्रग्स मुंबईला पाठवण्यात येणार होते. त्यानंतर ते आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार होते. परंतु त्याआधीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.

क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *