Pune Kurkumbh Drug Racket: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने कुरकुंभ MIDC मध्ये आज दिवसभर केलेल्या कारवायांमध्ये तब्ब्ल ५०० किलो पेक्षा अधिक मेफॅड्रोनचा साठा जप्त केला आहे. आत्ता पर्यंतच्या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्ब्ल ११०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे ड्रग्ज जप्त केले असल्याची माहिती आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.(Pune Kurkumbh Drug Racket: Has Kurkumbh MIDC in Daund become a drug haven? 1100 crore MD seized)
दरम्यान, १९ फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी पुणे शहरातून ५२ किलो पेक्षा अधिक ड्रग्स जप्त केली आहेत. या ड्रग्सची किंमत तब्ब्ल १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. या प्रकारा मध्ये पुणे पोलिसांनी वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख या तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडे ड्रग्जची पोती घेऊन आलेल्या टेंपोच्या चालकांकडे चौकशी केल्यानंतर कुरकुंभच्या कारखान्याची माहिती पोलिसांना मिळाली. या कारखान्यामध्ये गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला असून तिथे पोलिसांना तब्बल पाचशे किलो मेफोड्रेन मिळून आलं.(Pune Kurkumbh Drug Racket)
Pune Kurkumbh Drug Racke: दौंड मधील कुरकुंभ MIDC बनलीयं ड्रग्जचा अड्डा?
याचंबरोबर, मुंबईमधील पॉल आणि ब्राऊ नावाच्या दोन ड्रॅग पेडलर अर्थात ड्रग्ज विक्रेत्यांची माहिती पोलिसांच्या हाती लागलेली आहे. पुण्यातील कुरकुंभ MIDC मधून जप्त केलेले मेफेड्रोन या दलालांमार्फत संपूर्ण देशभरामध्ये आणि विदेशात वितरित केले जाणार होते. कोणाला वाटलंही नसेल की एवढा मोठा कोट्यांचा ड्रग्जचा साठा कुरकुंभ MIDC मध्ये असेल.
कुरकुंभमध्ये केलेल्या कारवाईत पोलिसांनी दोन केमिकल एक्सपर्ट ताब्यात घेतले आहेत. तसेंच कंपनीच्या अनिल साबळे नावाच्या मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही फार्मसुटीकल कंपनी आहे. याठिकाणी औषधांची निर्मिती केली जात होती. ऑक्टोबर २०२३ पासून इथे मेफोड्रेनची निर्मिती केली जात असल्याच तपासात समोर आलंय.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा आणि पुणे पोलिसांच्या विविध पथकांनी देशभरातील विविध शहरांमध्ये छापेमारी सुरू केली आहे. राज्याबाहेर देखील मोठ्या प्रमाणावर छापे टाकले जात आहेत. त्याकरिता केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतली जात आहे. (Pune Kurkumbh Drug Racket)
महत्वाच्या बातम्या:-
- Couple Video: बॉयफ्रेंडसोबत आईनं पकडलं मुलीला रंगेहाथ अन् केली अशी अवस्था की…
- मोठी बातमी! रिषभ पंत आयपीएलसाठी फिट, लवकरच भारतीय संघात परतणार