वानिंदू हसरंगाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारा पहिला श्रीलंकन खेळाडू, अन् मलिंगा…

सध्या अफगाणिस्तान संघ श्रीलंका दौऱ्यावर असून श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात अफगाणिस्तानने 72 धावांनी पराभव स्वीकारला. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील हा श्रीलंकेचा सलग दुसरा विजय होता. तसेच वानिंदू हसरंगा श्रीलंका संघाचे कर्णधारपद संभाळले आहे. याबरोबरच श्रीलंकन संघाने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. सोबत हसरंगाने त्याच्या नावावर एक विक्रम देखील केला आहे.

याबरोबरच, पाहुण्या अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात श्रीलंकने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट्सच्या नुकसानावर 187 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ 17 षटकांमध्ये 115 धावा करून सर्वबाद झाला. कर्णधार वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याने दोन महत्वाच्या विकेट्स या सामन्यात घेतल्या. या दोन विकेट्स श्रीलंकेच्या विजयात महत्वाच्या होत्याच. पण सोबतच हसरंगाच्या खास विक्रमनासाठीही महत्वाच्या ठरल्या आहेत

अफगाणिस्तानविरुद्धच्या या दुसऱ्या सामन्यात दोन विकेट्स घेताच त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या 100 विकेट्सचा टप्पा पार केला. हसरंगा सर्वात कमी सामन्यांमध्ये 100 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा श्रीलंकन गोलंदाज बनला आहे. त्याने माजी दिग्गज लसिथ मलिंगा याचाही विक्रम मोडीत काढला. हसरंगाने या 100 विकेट्ससाठी एकूण 63 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. दुसरीकडे मलिंगाला ही कामगिरी करण्यासाठी 76 सामने खेळावे लागले होते.

दरम्यान, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 2006 मध्ये सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत केवळ 11 खेळाडू असे आहेत, ज्यांनी क्रिकेटच्या या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडचा टिम साउदी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. साउदीने 122 सामन्यांमध्ये 157 विकेट्स घेतल्या आहेत.

घ्या जाणून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू

टिम साउदी – 157 (122 सामने)
शाकिब अल हसन – 140 (117)
ईश सोढी – 132 (109)
राशीद खान – 130 (82)
लसिथ मलिंगा – 107 (84)
आदिल राशीद – 107 (104)
मिचेल सँटनर – 106 (97)
मुस्तफिझूर रहमान – 105 (88)
शादाब खान – 104 (92)
मार्क अडायर – 102 (74)
वानिंदू हसरंगा – 101 (63)

महत्वाच्या बातम्या – 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *