मोठी बातमी: शरद पवार यांना मिळालं ऐतिहासिक ‘चिन्ह’; निवडणूक आयोगाची घोषणा

‘Turha’ Sharad Pawar Party New Symbol: पुणे। अजित पवारांच्या बंडा नंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने अजित पवार यांना देण्यात आले. त्यांनतर आता शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून नवं चिन्ह देण्यात आलं आहे.  सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला लवकरात लवकर चिन्ह देण्याचे आदेश दिले होते. शरद पवार गटाकडून तीन पर्याय देण्यात आले होते. त्यातील शरद पवार गटाचं नवीन चिन्ह देण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. Big news: Sharad Pawar gets historic mark; Announcement of Election Commission

दरम्यान, शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला नवं निवडणूक चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोगानं ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह त्यांच्या पक्षाला बहाल केलं आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाने केलेली पोस्ट:-

“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे.”

महत्वाच्या बातम्या :-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *