IPL 2024 : गुजरात टायटन्सला मोठा धक्का, आयपीएल 2024 मधून मोहम्मद शमी बाहेर

IPL 2024 : सध्या आयपीएलच्या 17 व्या हंगामाबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. आज आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. तसेच आयपीएल अध्यक्ष अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी दोन दिवसांपूर्वीच आयपीएलच्या वेळापत्रकाबाबत अपडेट दिली होती. 22 मार्च पासून आयपीएलच्या रणधुमाळीला सुरुवात होईल, असे अरुण धुमाळ यांनी सांगितलं होतं. देशात यंदा लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्याचवेळी आयपीएलचा थरारही होणार आहे. 

अशातच इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL-2024) सुरू होण्यापूर्वी गुजरात टायटन्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आगामी स्पर्धेतून बाहेर पडला आहे. कारण घोट्याच्या दुखापतीमुळे तो यंदाच्या मोसमात खेळू शकणार नाही. त्यामुळे आयपीएल संघासाठी तसेच टीम इंडियासाठी ही चांगली चिंतेचीबाब समोर आली आहे. तसेच त्याच्या डाव्या घोट्यावर ब्रिटनमध्ये शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

याबाबत बीसीसीआयच्या सूत्रांनी गुरुवारी पीटीआयला ही माहिती दिली आहे. तसेच गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर तो भारतीय संघाच्या बाहेर आहे. याबरोबरच बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे की, ‘शमीच्या  घोट्यावर इंजेक्शनसाठी त्याला जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लंडनमध्ये जावे लागणार आहे. त्यामुळे  त्याचा आयपीएलमध्ये खेळण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.

दरम्यान, शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दुखापतग्रस्त असतानाही चमकदार कामगिरी केली होती. त्याने स्पर्धेत सर्वाधिक 24 बळी घेतले होते. त्यानंतर शमीला अर्जुन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेपूर्वी शमीचे पुनरागमन होण्याची शक्यता नाही. तसेच तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यापर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होण्याचे शमीचे लक्ष्य असणार आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *