Baramati Lok Sabha: इंदापूरमध्ये झळकले सुनेत्रा पवारांचे फिक्स खासदार २०२४ चे बॅनर

Baramati Lok Sabha Election: लोकसभा निवडुका काही महिंनावर आल्या असताना संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती लोकसभेकडे लागले आहे. कारण येथे नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगण्याची शक्यता आहे. जरी अजित पवार गटाने बारामती लोकसभेसाठी अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नसली तरी सुनेत्रा पवारया फिक्स उमेदवार असल्याचे चित्र दिसतं आहे.(Baramati Lok Sabha: Sunetra Pawar’s Fix MP 2024 banner spotted in Indapur)

Baramati Lok Sabha: इंदापूरमध्ये झळकले सुनेत्रा पवारांचे फिक्स खासदार २०२४ चे बॅनर

बारामती लोकसभेमधील इंदापूरमध्ये सुनेत्रा पवारांचे फिक्स खासदार २०२४ चे बॅनर लागले आहेत. सध्या सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभेमध्ये दौरे वाढवले आहेत. त्यामुळे बारामती लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना निश्चित असल्याचे दिसत आहे. त्यामुळे बारामतीमध्ये पवार कुटुंबियांमध्येच लढत होणार हे निश्चित मानलं जातं आहे.

Baramati Lok Sabha: सुनेत्रा पवार यांनी दौंडच्या भाजप आमदारांची घेतली भेट

अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) सध्या राजकारणामध्ये चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी बारामती लोकसभे मध्ये येत असलेल्या दौंडचे भाजप आमदार राहुल कुल(Rahul Kul) यांची त्यांच्या राहत्या घरी राहू येथे जाऊन भेट घेतली आहे. आपल्याला माहिती असेल की राहुल कुल हे भाजपचे आमदार तर कांचन कुल २०१९ सालच्या बारामती लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार होत्या.

🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX

दरम्यान, त्यांच्या या भेटीचे कारण सदिच्छा भेट म्हणून जरी असले तरी बारामती लोकसभेच्या (Baramati Lok Sabha) दृष्टीने दौंड तालुका फार महत्वाचा आहे. एवढंच नाही तर गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघातील दौरा वाढला आहे. मागे आपण पहिलाच असेल की अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पराभूत करणार असे आव्हान दिले आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांचा शिरूर दौरा महत्वाचा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा मुलगा पार्थ पवार यांना शिरूर लोकसभा मतदार संघातून यंदा निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांचे दौरे अशा चर्चाना उधाण आणण्याचे काम करत आहेत.

महत्वाच्या बातम्या :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *