Ch. Sambhajinagar: ही कसली भरतीची तयारी? अकॅडमीतील मुलांना अमानुष मारहाण VIDEO VIRAL

Ch. Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधील गरुडझेप अकॅडमीतील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी गरुडझेप अकॅडमीमध्ये २ विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता इथले बरेच धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. इथं विद्यार्थ्यांसोबत अमानुष कृत्य होत असल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. (Ch. Sambhajinagar: What recruitment preparation is this? Inhuman beating of children in the academy VIDEO VIRAL)

मीडिया रिपोर्टनुसार, बजाजनगरातील पोलीस आणि सैन्य भरतीचे प्रशिक्षण देणारी ही अकॅडमी आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी येणाऱ्या मुला-मुलींना या अकॅडमीच्या वसतिगृहात अक्षरशः कोंडवाड्यात जनावरांना कोंबल्यासारखी राहावं लागत असं समोर आलं आहे. अकॅडमीतील अशा कारभारामुळे काही दिवसांपूर्वीच २ मुलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX

दरम्यान, पुन्हा मुलांना अमानुष हाणमार करतानाच व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. १९ वर्षांच्या लीना पाटील आणि श्रीकांत वाघ या दोन युवकांनी अकॅडमीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणामध्ये पोलिसांनी अकॅडमीच्या संचालकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संचालक नीलेश सोनवणे, सुरेश सोनवणे, विजय राठोड, शुभम घुगे अशी त्यांची नावं असल्याचे पोलिसांनी माध्यमांना सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या:

(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.”)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *