Manoj Jarange: मराठा समाजाचे नेते मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेले होते. आज त्यांच्या उपोषणाचा १६ वा दिवस आहे. आज त्यांनी बिठाक घेऊन फडणवीसांवर मोठे गंभीर आरोप केले आहेत.(Manoj Jarange: “Fadnavis raised gang to defame me” Manoj Jarange Patil)
Manoj Jarange: “देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा डाव”
अंतरवाली सराटी येथेल उपोषण स्थळावरून मनोज जरांगे यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत ते म्हणाले, यांनी मराठा समाजासंदर्भात सर्व काही देवेंद्र फडवणीस करत आहे. अजय महाराज बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत. अजित पवार यांचे दोन आमदार त्यामध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काही लोक हे काम करत आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांचा प्रवक्ता पण त्यामध्ये आहेत. मी आज टोकाचा निर्णय घेत आहे. मला मारण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. माझा एन्काउंटर करण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो. माझा बळी घ्या. असे गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकार वरती केले आहेत.
Manoj Jarange: “फडणवीसांमुळे खडसे, पटोले भाजप सोडून गेले”
पुढे ते म्हणाले, एकनाथ शिंदे सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करतील. परंतु फडवणीस करू देत नाही. अंतरावालीमध्ये महिलांवर हल्ला झाला. त्या प्रकरणात फडणवीस यांना माफी मागावी लागली. त्यामुळे माझ्यावर फडवणीस यांचा राग आहे. त्याचे जो ऐकत नाही त्यांना ते संपवतात. त्यांना मला बदनाम करायचे आणि संपवायचे आहे. फडणवीस यांना कोणी पुढे गेलेले आवडत नाही. त्यांच्यामुळे पक्षातील लोकही त्यांना सोडून जात आहे. खडसे, पटोले फडणवीस यांच्यामुळे सोडून गेले.
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
Manoj Jarange: “महादेव जानकर यांनाही फडणवीस यांनी मोठे होऊ दिले नाही”
महादेव जानकर यांनाही फडणवीस यांनी मोठे होऊ दिले नाही. बामणी कावा माझ्या पुढे चालणार नाही. मी पायी तुझ्या कडे येत आहे, तुझ्या दारात येत आहे. माझा बळी घेऊन दाखवा. माझ्या उपोषणा दरम्यान मृत्यू झाल्यास मला सागर बंगल्यावर नेऊन टाका. खुमखुमी असेल तर फडणवीस यांनी समोर यावे. बारसकर, राणेंच्या मागून माझ्यावर हल्ला करु नका. असे गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवरती केले आहेत. Manoj Jarange
महत्वाच्या बातम्या: