Bade Miyan Chote Miyan: लवकरच बॉलिवूडचे सुपरस्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचा ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. त्यासाठी दोन्ही स्टार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ठिकठिकाणी कार्यक्रम घेत आहेत. त्यांच्या कार्यक्रमांना चांगलीच गर्दी देखील होताना दिसत आहे. यामध्ये अनेक वेळा चाहत्यांमध्ये चेंगराचेगरी होतानाचा व्हिडीओ समोर येतो. असाच एक व्हिडीओ लखनऊ मधून समोर आला आहे.(Bade Miyan Chote Miyan: Fans stampede to meet Akshay Kumar and Tiger Shroff)
दरम्यान, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan)हा चित्रपट ९ एप्रिल रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सध्या या चित्रपटाचे निर्माते आणि संपूर्ण स्टारकास्ट प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सोमवारी लखनौमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दाखल झाले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमामध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर आली आहे.
त्याचबरोबर, चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमावेळी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ दोघेही स्टंट करत स्टेजवर आले. ते स्टेजवर आल्यानंतर चाहत्यांच्या जमावाने पुढे जाण्याच्या प्रयत्नात बॅरिकेड तोडले त्यामुळे एकाच गोंधळ उडाला. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज देखील करावा लागला. त्यावेळी जमाव पांगला.
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
त्यांनतर काही वेळानी जमावातील काही लोकांनी स्टेजच्या दिशेने चप्पल फेकण्यास सुरुवात केली. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान झालेल्या या गोंधळाचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे Bade Miyan Chote Miyan चित्रपट प्रदर्शित होण्या आधीच त्याची चर्चा मात्र सर्वत्र होऊ लागली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- india vs england 4th test: हिटमॅनचं हिट अर्धशतक; टीम इंडिया मालिका विजयाच्या जवळ
- Manoj Jarange: “मला बदनाम करण्यासाठी फडणवीसांनी टोळी उभी केली” मनोज जरांगे पाटील
(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व ट्रेंडिंग माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.”)