Guinness World Record : आपल्या जगात असे अनेक लोक आहेत जे आपल्या अनोख्या कारनाम्यामुळे प्रसिद्धी मिळवत असतात. यामध्ये अनेक लोक रेकॉर्ड तयार करण्यासाठी विविध डावपेचांचा आणि अतरंगी कला गुणांचं अवलंब करतात. असाच एक अतरंगी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड एका २९ वर्षीय मुलीने केला आहे. यामध्ये मुलीने झाडाला मिठी मारली अन् त्याची झाली गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद याची माहिती स्वतः गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने दिली आहे.(Guinness World Record: Is it that bad? The girl hugged the tree and entered the Guinness World Records)
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने दिलेल्या माहितीनुसार, युगांडाच्या एका महिला पर्यावरण प्रेमाने सर्वात जास्त काळ झाडाला मिठी मारण्याचा जागतिक विक्रम केला आहे. २९ वर्षीय फेथ पॅट्रिशिया एरिओकॉटने असा पहिला विक्रम केला आहे, यासाठी तिने तब्ब्ल १६ तास ६ सेकंदांपर्यंत झाडाला मिठी मारली आहे.
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
Guinness World Record: रेकॉर्ड बनवल्यानंतर काय म्हणाली फेथ पॅट्रिशिया?
लोकांना झाडे लावण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी तिने हे केले असल्याचे तिने सांगितले आहे. ती म्हणाली, “वातावरण बदलाविरुद्धच्या लढ्यात झाडे हे आपले सर्वात मोठे मित्र आहेत.” पुढे ती म्हणाली, हा विक्रम करण्यासाठी झाडाची निवड करणे म्हणजे वधूने आपले कपडे निवडण्यासारखेच होते. मात्र झाडाने मला निवडले आणि ते पहिल्या नजरेतल्या प्रेमासारखे होते.
Guinness World Record: तिसऱ्या प्रयत्नात आलं तिला यश
GWR च्या मते, हा त्याचा तिसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नात तिचा कॅमेरा खराब झाला आणि दुसऱ्या प्रयत्नात वादळ आले, त्यामुळे तिला हा उपक्रम थांबवावा लागला, मात्र तिसऱ्यांदा विश्वविक्रम करण्यात ती यशस्वी ठरली. GWR च्या वेबसाईटवर या मुलीचे अनेक फोटो शेअर करण्यात आले आहेत. Guinness World Record
महत्वाच्या बातम्या :