IPL 2024,Hardik Pandya Comeback: मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या इज बॅक

IPL 2024,Hardik Pandya Comeback: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मैदानावर पुन्हा आलेला आहे. तो यंदाची IPL देखील खेळणार असल्याचे समोर आले. हार्दिक हा सतत दुखापतीमुळे मैदान बाहेर असतो. अशात तो यंदाची IPL 2024 खेळणार का नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता.(IPL 2024, Hardik Pandya Comeback: Good news for Mumbai Indians! Mumbai captain Hardik Pandya is back)

दरम्यान, हार्दिकने गोलंदाजी आणि फलंदाजी करत चाहत्यांना सुखद धक्का दिलाय. आयपीएल २०२४(IPL 2024) आणि विश्वचषकाआधी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मैदानावर परतल्यामुळे भारतीय चाहते सुखावले आहेत. हार्दिक पांड्या डीवाय पाटील टी20 स्पर्धेतून मैदानावर परतला आहे. वनडे विश्वचषक २०२३ (World Cup 2023) स्पर्धेदरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती.

त्यांनतर हार्दिक पांड्या तब्ब्ल चार महिने आता पुन्हा आपल्याला मैदानावर दिसणार आहे. दरम्यान, डीवाय पाटील टी20 स्पर्धेत हार्दिक पांड्याने रिलायन्स १ संघाचं कर्णधारपद सांभाळलं आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड संघाविरोधात हार्दिक पांड्यानं गोलंदाजी आणि फलंदाजीत हात अजमावला. या सामन्यमध्ये हार्दिकने ३ शतकांमध्ये २२ धाव दिल्या. येवढंच नाही तर दोन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रास्ता दाखवला.

क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX

त्याचबरोबर, हार्दिकच्या संघाने १५ षटकात ८ विकेटच्या मोबदल्यात १२६ धावांचे आव्हान सहज पार केले. त्यामुळे आता तो IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद सांभाळणार आहे. येवढंच नाही तर आगामी टी २० विश्वचषकांसाठी महत्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या परतल्याने मुंबई आणि भारतीय चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. IPL 2024,Hardik Pandya Comebac

महत्वाच्या बातम्या:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *