Manoj Jarange: ज्या समाजासाठी लढा पुकारला; आज त्यांनीच जाळला मनोज जरांगेंचा पुतळा, VIDEO

Manoj Jarange’s effigy was burnt by the Maratha community: नागपूर। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी गेली सात-आठ महिने जालन्यातील अंतरवाली सराटी मधून मराठा आंदोलक मनोज जरांगे हे वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. परंतु काल मनोज जरांगे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत मोठे गंभीर आरोप केले. त्यामुळे आता अनेक ठिकाणी मनोज जरांगेच्या विरोधात भाजप नेते आक्रमक झाले आहेत. अशातच नागपूर मधून एक मोठी बातमी समोर आली आहे.(Manoj Jarange: The Society Who Fought for; Today they burnt the effigy of Manoj Jarang, VIDEO)

दरम्यान, मनोज जरांगेंच्या या टीकेविरोधात नागपुरात आंदोलन करण्यात आलं. नागपूरच्या गांधी गेट परिसरात सकल मराठा समाज विदर्भ प्रांताच्या वतीने मनोज जरांगेंचा निषेध करण्यात आला. यवढंच नाही तर आंदोलकांनी जरांगे पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसंच जरांगेंचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला.

यावेळी सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी माध्यमांना तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे पाटील मराठा समजाच्या आरक्षणाचं नेतृत्व करत होते, पण आता समाज म्हणजे मी असे वागत आहेत, त्यांची भाषा आक्षेपार्ह आहे, जरांगेंच्या शब्दप्रयोगावरून मराठा समाजाच्या अस्मितेला ठेच लागत आहे, त्यामुळे त्यांच्याविरोधात आंदोलन केल्याचं यावेळी आंदोलकांनी सांगितले.

क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX

मनोज जरांगे यांच्यासह ४२५ जणांवर गुन्हा दाखल

बीडमध्ये मनोज जरांगे यांच्यासह रास्ता रोको करणाऱ्या ४२५ जणांवरती २२ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले गेले आहेत. याबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘मी कुठे रास्तारोको केला, गुन्हे दाखल करायला. रास्ता रोकोचा निर्णय समाजाने मिळून घेतला आहे, याचे परिणाम आणखी भोगावे लागतील. प्रत्येकवेळी पोलिसाचा वापर केला तर लोकं ऐकणार नाहीत. फडणवीसांना दुसऱ्यांदा अंतरवाली सराटी घडवायची होती. इथं काही झालं असतं तर राज्य बेचिराख झालं असतं. शिंदे साहेब तुम्हाला शेवटची संधी आहे, मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका’

महत्वाच्या बातम्या:

(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व ट्रेंडिंग माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.”)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *