Murder of Anamika Bishnoi: राजस्थानच्या फलोदी मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फलोदी मध्ये एका महिलेची पतीने गोळी घालून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे देशातील महिलांच्या सुरक्षेचा विषय पुन्हा चव्हाटयावर आलं आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हाइरलं होत आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Murder of Anamika Bishnoi: Murder of Anamika Bishnoi in broad daylight; VIDEO VIRAL OF INCIDENT)
दरम्यान, हत्येची संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. महिला ही सोशल मीडिया इन्फ्लुंएसर होती. सोशल मीडियावर महिलेचे लाखो फॉलोअर्स आहेत. अनामिका बिश्नोई असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार तिच्या पतीनेच तिची गोळ्या घालून हत्या केली आहे.
व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकता की, महिला शोरुममध्ये काम करत बसली होती. थोड्याच वेळाने तिचा पती तिच्या जवळ येतो त्यांच्या काही वाद होताना व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर तो खिश्यातील बंदूक हातात घेऊन अनामिकाच्या मानेवर गोळी मारतो. या घटनेमध्ये अनामिकाचा मृत्यू होतो. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
त्याचंबरोबर, मीडिया रिपोर्टनुसार, अनामिक आणि तिच्या पतीचा घटस्फोट होणार होता. अनामिका मुलांसोबात पती पासून दुसरी कडे राहत होती. याचं रागातून पतीने तिची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमध्ये पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेने संपूर्ण राजस्थान हादरले आहे.Murder of Anamika Bishnoi
महत्वाच्या बातम्या:
- Maratha Reservation : मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जालन्यात पेटवली एसटी बस
- india vs england 4th test: हिटमॅनचं हिट अर्धशतक; टीम इंडिया मालिका विजयाच्या जवळ
(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व ट्रेंडिंग माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.”)