IND Vs ENG : भारतीय संघाकडून इंग्रजांना त्यांच्याच भाषेत उत्तर, अन् सरफराज-बेअरस्टोचा मैदानावरच राडा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताचे युवा खेळाडू आणि इंग्लंडचे अनुभवी खेळाडू यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली आहे. प्रथम सर्फराज खान आणि मार्क वुड, नंतर बेन स्टोक्स आणि सरफराज खान आणि आता तिसऱ्या दिवशी जॉनी बेअरस्टो आणि भारताचा शुभमन गिल या गोंधळात सामील होता आणि नंतर सर्फराज खानने बेअरस्टोचा चांगलाच माज जिरवला आहे.

याबरोबरच जॉनी बेअरस्टो वेगवान फलंदाजी करत असताना त्याने स्लिपवर उभ्या असलेल्या शुभमन गिलला स्लेज करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शुबमन गिल आणि जेम्स अँडरसन यांच्यात काहीतरी चर्चा होत असताना बेअरस्टोने गिलला त्या क्षणाची आठवण करून दिली होती. त्यानंतरच अँडरसनने पुढच्या षटकात गिलला बाद केले होते. बेअरस्टोने याच घटनेबद्दल काहीतरी सांगितले. त्याला उत्तर देताना गिल म्हणाले की, किमान 100 झाले पण तुम्ही तिथेही पोहोचला नाही. तसेट ध्रुव जुरेलही गिलला सपोर्ट करताना पहायला मिळाला आहे.

अशातच भारताने मालिका 4-1 ने जिंकल्याने टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. गुणातालिकेतील अव्वल स्थान कायम ठेवलं असून विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कसोटी सामन्याचा निकाल काहीही लागला तरी त्याचा भारताच्या अव्वल स्थानावर काही एक परिणाम होणार नाही. त्यामुळे आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीकडे खऱ्या अर्थाने भारताने कूच केली आहे.

दरम्यान, इंग्लंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येनुसार भारतीय संघाने 259 धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ अवघ्या 100 धावांवर निम्मा संघ पॅव्हेलियनबाहेर गेला होता. बेअरस्टोने 31 चेंडूत 39 धावा करत डाव काही प्रमाणात पुढे नेला पण कुलदीप यादवने त्याचा झेल घेतला. यानंतर उपाहारानंतर खेळायला आलेल्या इंग्लंडला अश्विनने सहावा धक्का दिला आणि बेन फॉक्सलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यामुळे त्याने आपल्या 100व्या कसोटीत पाच बळींचा टप्पा पूर्ण केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *