महत्वपूर्ण लढतीत रायगड संघाची नांदेड संघावर मात

पुणे (9 मार्च 2024) – नांदेड विरुद्ध रायगड यांच्यात आजची तिसरी लढत झाली. नांदेड संघ 2 विजय व 2 पराभवासह पाचव्या क्रमांकावर होता. तर रायगड संघ 4 सामन्यात 1 विजयासह सातव्या क्रमांकावर होता. आजची लढत दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्वपूर्ण होती. रायगडच्या निखिल शिर्के व प्रशांत जाधव ने आपल्या चढाईत गुण मिळवत संघाचा खात उघडला. त्यानंतर पंकज राठोड ने नांदेड संघाला पहिला गुण मिळवून दिला. सामन्याच्या 7 व्या मिनिटाला 6-6 असा सामना बरोबरीत होता.

नांदेडच्या पंकज राठोड व याकुब पठाण ने अष्टपैलू खेळ करत रायगड संघाला ऑल आऊट केले. तर रायगडचा प्रशांत जाधव एकाकी झुंज देत होता. रायगडाच्या राज जंगमची स्ट्रगल मध्ये 3 वेळा नांदेड संघाने पकड केल्याने मध्यंतराला नांदेड संघाकडे 17-14 अशी निर्यायक आघाडी होती. मध्यंतरा नंतर सामना अत्यंत चुरशीचा झाला. याकुब पठाण व रायगडच्या बचावपटूं मध्ये चांगला संघर्ष बघायला मिळाला आहे.

सामन्याची शेवटची 10 मिनिटं शिल्लक असताना 22-22 असा सामना बरोबरीत सुरू होता. त्यानंतर सलग दोन चढाईत राज जंगम ने गुण मिळवत रायगड संघाला आघाडी मिळवून दिली. 7 मिनिटं शिल्लक असताना नांदेड संघाला ऑल आऊट करत रायगड संघाने 27-23 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर राज जंगम ने 4 गुणांची सुपर रेड करत निर्यायक आघाडी मिळवून दिली. राज जंगमच्या सुपर टेन खेळीच्या जोरावर रायगड संघाने 41-24 अशी नांदेड संघावर मात देत गुणतालिकेत महत्वपूर्ण 6 गुण मिळवले.

बेस्ट रेडर- राज जंगम, रायगड
बेस्ट डिफेंडर- करण भगत, रायगड
कबड्डी का कमाल- शक्ती शेडमके, नांदेड

युवा कबड्डी सिरीज बद्दल सर्व Live Update मिळवण्यासाठी Yuva Kabaddi Series चे अधिकृत अँप डाऊनलोड करा.

महत्वाच्या बातम्या :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *