ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. भोर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत असताना ते म्हणाले आहेत की, सुप्रिया सुळेंची उमेदवार म्हणून घोषणा करतो. देशात पहिले दोन किंवा तीन खासदार जे काम करणारे आहेत, ज्यांची पार्लमेंटमध्ये जास्तीत जास्त उपस्थिती आहे आणि सात वेळेला ज्यांना संसदरत्न मिळाला, असा उमेदवार तुमच्यासमोर आहे. त्यांना निवडून आणण्याची जाबाबदारी तुमची आहे, असं म्हणत पवारांनी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून एकीकडे सुप्रिया सुळे शरद पवार गटाकडून उमेदवार असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याचं बोललं जातं आहे.याबरोबरच संग्राम थोपटे यांच्याबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, तुम्ही जे काही कराल तुमच्या पाठिशी शरद पवार कायम असेल. एकदा मी पाठिशी असलो की परिवर्तन झाल्याशिवाय रहात नाही.
तसेच मागच्या काही दिवसांपासून जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठका सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्यासाठी सर्वच पक्षांचे नेते प्रयत्न करत आहेत. परंतु प्रकाश आंबेडकरांशी अद्याप वाटाघाटी झालेल्या नाहीत. दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त जळोची येथील काळेश्वर मंदीरात सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे यांची अचानकच भेट झाली होती. दोघी एकमेकांसमोर आल्यानंतर दोघींनीही गळाभेट घेत एकमेकींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भेटीचा आनंद दोघींच्याही चेह-यावर दिसला होता.
महत्वाच्या बातम्या :