Haryana BJP- JJP Break Up: सरकार हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे कोसळणार होते परंतु झटके मात्र भाजपला हरियाणामध्ये बसले (Haryana BJP-JJP Break Up) आहेत. कारण एन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हरिणामध्ये भाजप आणि मित्रपक्ष असलेल्या जेजेपीचं जागावाटपावरून सरकार कोसळले आहे. मित्रपक्ष असलेल्या जेजेपीला भाजपने लोकसभेची एकही जागानं दिल्याने जेजेपीने हरियाणामधील भाजपचं सरकार उलथवले आहे. याचाच संदर्भ आता महाराष्ट्रामध्ये देखील लावण्यात येतं आहे. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीच्या जागावाटपावरून वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे.(Haryana BJP-JJP Break Up: Will BJP Shinde Pawar’s alliance break up over seat sharing?)
दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, काल पर्यंत जेजेपीचे नेते दृश्यांत चोधरी(Haryana BJP-JJP Break Up) आणि भाजपमध्ये जागा वाटपाचे काम सुरु होते. हरियाणामध्ये लोकसभेच्या १० जागा आहेत परंतु यामधील २ जागा मित्रपक्ष असलेल्या जेजेपीने मागितल्या परंतु भाजपने मोठ्या अहंकाराने त्यांना एकही जागा नं देण्याचे सांगितले. त्यामुळे त्यांची युती तुटली आहे. सध्या भाजपने मुख्यमंत्री बदल करत काही अपक्षांना सोबत घेतले आहे.
हरियाणा काँग्रेसचे जाट नेते दीपेंद्र हुड्डा यांनी या विषयाबाबत बोलताना सांगितले आहे की, हा भाजपचाच एक डाव आहे. हे दोन्ही पक्ष आतून एकाच आहेत. असच काही महाराष्ट्रामध्ये देखील घडण्याचे अनेक लोक सांगत आहेत. कारण जागा वाटपावरून भाजप शिंदे पवारांना डावलत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
🏏क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा- https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
जागावाटपा वरून भाजप शिंदे पवारांची युती तुटणार?
दरम्यान, हरियाणामध्ये जशी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जेजेपीने निवडणुकीच्या (Haryana BJP-JJP Break Up) तोंडावर साथ सोडली आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये देखील घडण्याची शक्यता आहे. निवडणुकींच्या तोंडावर भाजपला कंटाळून शिंदे पवार स्वतंत्र निवडणूक लढू शकतात. त्यामुळे जसं हरियाणामध्ये घडलं तसं महाराष्ट्रामध्ये देखील घडण्याचे संकेत आताचं आपल्याला लोकसभा जागावाटपावरून पाहायला मिळतं आहेत. Haryana BJP-JJP Break Up
महत्वाच्या बातम्या:
- धुळे संघावर विजय मिळवत रायगड संघ प्रमोशन फेरीच्या शर्यतीत कायम
- ज्येष्ठ नेते शरद पवारांकडून सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारीची घोषणा, म्हणाले…