Vasant More left MNS: पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आक्रमक चेहरा, मनसेचे फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी मोठा निर्णय घेत मनसेला अखेर आज जय महाराष्ट्र ठोकला आहे. आज सकाळी त्यांनी फेसबुक वरून पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर फेसबुक पोस्ट करत त्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र ठोकला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. यापूर्वी देखील अनेकदा त्यांच्या नाराजीच्या बातम्य देखील समोर आल्या होत्या. ते वारंवारं आपली नाराजी देखील व्यक्त करत होते. (Vasant More left MNS: Vasant More on the way to Congress?)
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा, दौरे, बैठका घेत असतानाच मनसेला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता पुण्यातील राजकारणाचे समीकरण देखील बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वसंत मोरेंच्या जाण्याने पुणे मनसेला मोठं भगदाडं पडलं आहे.
Vasant Morecha left MNS: स्वपक्षातील वरिष्ठांकडून माझ्याविरोधात ‘कोंडी तंत्र’
“गेली दोन-तीन वर्षांपासून पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझी कोंडी करण्याचं तंत्र अवलंबलं जात आहे. एकीकडं पक्षांतर्गत राजकारण, तर दुसरीकडं पक्षाविषयीच्या माझ्या निष्ठेवर उपस्थित केले गेलेले प्रश्नचिन्ह या गोष्टी माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहेत. या सर्व त्रासाला कंटाळून अखेर मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे,” असं पत्र वसंत मोरेंनी राज ठाकरे याना लिहीत मनसेला राम राम ठोकला आहे.
Vasant Morecha left MNS: वसंत मोरें काँग्रेसच्या वाटेवर?
वसंत मोरे हे अनेक दिवसांपासून पुणे लोकसभा लावाढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी याविषयी आपले मत अनेकदा माध्यमां समोर देखील व्यक्त केले होते. परंतु मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या एका कार्यक्रमांमध्ये शर्मिला ठाकरे यांनी ‘साईनाथ बाबर जर दिल्लीत गेले तर दुधात साखर’ अशा प्रकारचे वक्तव्य करत साईनाथ बाबर यांचं पुणे लोकसभेसाठी उमेदवारी असू शकते अशा पद्धतीचे संकेत दिले होते.
त्यामुळे पुणे लोकसभेसाठी मनसेने त्यांना डावलल्याने वसंत मोरेंनी मनसेला राजीनामा ठोकल्याचे सांगण्यात येत आहे. ते आता लवकरच काँग्रेसमध्ये जाण्याच्या चर्चा देखील आता होऊ लागल्या आहेत. जरी त्यांनी अधिकृत पने आपला निर्णय जाहीर केला नसला तरी वसंत मोरेंचे काँग्रेसमध्ये जाण्याचे संकेत समोर आले आहेत.
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा-https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
दरम्यान, महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या काँग्रेस कडून पुणे लोकसभेसाठी मनसेचे माजी नेते आणि सध्याचे काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर असल्याचे दावे केले जात आहेत. त्यामुळे वसंत मोरे काँग्रेसमध्ये जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या: