Road Accident: IPS अधिकाऱ्याला मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीने उडवलं; व्हिडीओ व्हायरल

Road Accident in Telangana: तेलंगणाच्या हैदराबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या IPS अधिकाऱ्याला मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीने उडवलं असल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.(Road Accident in Telangana: IPS officer hit by minister’s convoy; The video went viral)

दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, मंत्र्यांच्या ताफ्याने सहाय्यक पोलिस अधीक्षक (एएसपी) आयपीएस परितोष पंकज यांना उडवले आहे. ते जखमी झाले आहेत. पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, आयपीएस परितोष पंकज, जे भद्राचलमचे एएसपी आहेत, सोमवारी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या शहर दौऱ्यादरम्यान बंदोबस्ताच्या ड्युटीवर असताना ही घटना घडली आहे.

क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा-https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX

या संदर्भात माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ते ठीक आहेत.’ त्याच्या डाव्या डोळ्याजवळ फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ते आता बरे आहेत. ते हैद्राबाद येथील रुग्णालयात आहे.” परंतु सध्या या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. Road Accident

महत्वाच्या बातम्या:

(“ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज “(Trending Maharashtra News) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व ट्रेंडिंग माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात येते. या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व “ट्रेंडिंग महाराष्ट्र न्यूज” (Trending Maharashtra News) स्वीकारत नाही.”)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *