पुणे (1३ मार्च 2024) – Yuva Kabaddi Series: ‘ब’ गटातील दुसरा सामना नंदुरबार जिल्हा विरुद्ध सांगली जिल्हा या संघाच्या मध्ये झाला. दोन्ही संघाना पहिल्या चढाईत गुण मिळाले नाहीत. सांगलीच्या दुसऱ्या चढाईत अभिराज पाव ने गुण मिळवत आपल्या संघाचा खात उघडला. तर नंदुरबारच्या तेजस राऊत ने पुढील चढाईत गुण मिळवत आपाल्या संघाचा खात उघडला. दहा मिनिटांच्या खेळानंतर दोन्ही संघ 7-7 अश्या बरोबरीत होते. दोन्ही संघांनी चढाईत 5 तर पकडीत 2 गुण मिळवला होते.(Yuva Kabaddi Series: Nandurbar beat Sangli in a tight match)
अत्यंत चुरशीच्या या सामन्यात दोन्ही संघ तिसऱ्या चढाईवर खेळले. मध्यंतरा पर्यत कोणत्याही संघाला 2 पेक्षा मोठी आघाडी एकदाही मिळवता आली नाही. मध्यंतराला सांगली संघाकडे 12-10 अशी नाममात्र 2 गुणांची आघाडी होती. मध्यंतरा नंतर थोडा झटापट खेळ झाला. शेवटची दहा मिनिटं शिल्लक असताना सांगली संघाने नंदुरबार संघाला ऑल आऊट करत 23-19 अशी 2 गुणांपेक्षा मोठी आघाडी मिळवली.
क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा-https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX
सामन्याची शेवटची दोन मिनिटं शिल्लक असताना तेजस राऊत ने सुपर रेड करत 28-27 अशी नंदुरबार संघाला आघाडी मिळवून दिली होती. तर 1 मिनिटं शिल्लक असताना पुन्हा एकदा सांगली कडे 1 गुणांची आघाडी होती. 30 सेकंद शिल्लक असताना नंदुरबार संघाने सांगली ला ऑल आऊट करत सामना आपल्या बाजूने केला. नंदुरबार संघाने चुरशीचा सामना 36-31 असा विजय मिळवला. तेजस राऊत ने सुपर टेन करत महत्वपूर्ण भूमिका निभावली.
महत्वाच्या बातम्या: