Yuva Kabaddi Series: पालघर संघाचा सातारा संघावर एकतर्फी विजय

पुणे (1३ मार्च 2024) – Yuva Kabaddi Series: आजच्या दिवसाचा तिसरा सामना पालघर जिल्हा विरुद्ध सातारा जिल्हा ह्या संघात झाला. सामन्याच्या पहिल्या चढाईतच पालघरच्या प्रतीक जाधव ने बोनस सह 1 खेळाडू बाद करत आघाडी मिळवली. सातारच्या यश निकम ने सुद्धा एक चढाईत 2 गुण प्राप्त केले. पहिल्या नऊ मिनिटानंतर 5-5 असा सामना बरोबरीत होता. त्यानंतर पालघरच्या प्रतीक जाधव व यश निंबाळकर यांनी चपळाई ने गुण मिळवत सातारा संघाला ऑल आऊट केले.(Yuva Kabaddi Series: Palghar team one-sided victory over Satara team)

मध्यंतरा पूर्वी सातारच्या बचावपटूंनी चांगल्या पकडी करत पालघरच्या चढाईपटूंना गुण मिळवण्यापासून थांबवलं होत. पालघर संघाने मध्यंतराला 16-11 अशी आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर पालघर संघाने आक्रमक खेळ करत सामन्यावर पकड मजबूत केली. पालघर संघाने मध्यंतरानंतर दोन वेळा ऑल आऊट करत सामना 44-24 असा एकतर्फी जिंकला.

क्रिकेटचा ग्रुप जॅाईन करा-https://chat.whatsapp.com/EjupNu0Z6J09blAeNMiSIX

पालघर संघाकडून यश निंबाळकर ने सुपर टेन सह 10 गुण मिळवले तर प्रतिक जाधव ने 6 गुण मिळवले. बचावपटूंमध्ये योगेश मोरसे 5 तर हर्ष मेहेर ने 3 पकडीत गुण मिळवले. प्रेम मंडळ व पियुष पाटील यांनी अष्टपैलू खेळी केली. सातारा कडून आनंद शिंदे ने 1 सुपर टॅकल सह पकडीत 5 गुण मिळवत हाय हाय पूर्ण केला.

बेस्ट रेडर- यश निंबाळकर, पालघर
बेस्ट डिफेंडर- योगेश मोरसे, पालघर
कबड्डी का कमाल- प्रेम मंडळ, पालघर

महत्वाच्या बातम्या :

युवा कबड्डी सिरीज बद्दल सर्व Live Update मिळवण्यासाठी Yuva Kabaddi Series चे अधिकृत अँप डाऊनलोड करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *