पावसाळ्यात शेतकऱ्यांनी घ्या ही तीन पिके मिळेल लाखोंचे उत्पन्न

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार लवकरच महाराष्ट्रभरात मान्सूनला सुरुवात होणार आहे. एवढेच नाही तर यंदा महाराष्ट्रभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी जास्त नफा मिळवण्यासाठी कोणती पिके घ्यावीत हेच आज आपण या लेखातून पाहणार आहोत. (During the rainy season, if farmers take these three crops, they will get an income of lakhs)

पावसाळ्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांनी ही तीन पिके घेतली पाहिजे

1.  पालक 

पावसाळ्यात पालकाची लागवड करून शेतकरी मोठी कमाई करू शकतो. एवढेच नाही तर पावसाळ्यात पालकाची लागवड केल्याने त्यावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. तसेच ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांमध्ये पालकाला चांगला भाव देखील मिळत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या पावसानंतरच पालकाची लागवड करावी.

एक एकर पालक लागवडी करता 15 ते 20 हजार रुपये खर्च येतो. तर पालक 45 ते 50 दिवसांमध्ये विक्रीसाठी तयार असतो. पालकाची कापणी आपण चार ते पाच वेळा करू शकतो अशा स्थितीत शेतकऱ्याला पालक विक्रीतून जवळपास दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते.

2. कोथिंबीर

पालकांनंतर कोथिंबीर देखील पावसाळ्यामध्ये चांगला भाव येत असतो त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या पावसानंतर कोथिंबीर पिकाची लागवड करावी. यामध्ये एक एकर कोथिंबीर लागवडीसाठी तब्बल वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येत असतो. त्यातून शेतकरी दोन ते तीन लाखांचे उत्पन्न सहज मिळवतो.

3. मेथी

पावसाळ्यामध्ये विशेषता पालक आणि कोथिंबीर बरोबरच मेथीला देखील चांगला भाव येत असतो. एक एकर मेथी लागवडीकरिता दहा ते पंधरा हजार रुपये सरासरी खर्च शेतकऱ्याला येत असतो. तर मेथीला पेरणी पासून ते विक्री पर्यंत किमान 45 ते 50 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळ्यामध्ये पालक कोथिंबीर आणि मेथी ही पिके घ्यावीत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *